STORYMIRROR

Murari Deshpande

Inspirational

4  

Murari Deshpande

Inspirational

साठवावे नेत्री

साठवावे नेत्री

1 min
329

फुलली फुलली । पंढरीची वाट ।

वाळवंटी थाट । वैष्णवांचा ।।


पुन्हा पुन्हा वाटे । धरावे ते पाय ।

एकची उपाय । तरण्याचा ।।


विठूमाऊलीचे । पाहताच मुख ।

त्रैलोक्याचे सुख । मिळते गा ।।


निघोनिया जाई । शीणभाग सारा ।

घाली प्रेमधारा । स्नेह स्नान ।।


तूच रे विठ्ठला । विश्वाचा या राजा ।

सांभाळीतो प्रजा । आनंदाने ।।


मायही विठ्ठल । विठ्ठलची बाप ।

सरे भवताप । चरणाशी ।।


सांगतो मुरारी । साठवितो नेत्री ।

पाहिले जे क्षेत्री । पंढरीत ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational