साथीदार
साथीदार
आलास माझ्या जीवनी
तू बनुनी माझा नाथ
आयुष्यभर राहुदे अशीच
तुझी माझी अविरत साथ
घेतलेस वेळोवेळी तू माझे
हृदयातील स्नेह जाणुनी
मिळाला मुलगा आपणास
भगवंताचा चा प्रसाद माणूनी
सुख दुःखाच्या प्रत्येक प्रसंगी
तू माझ्या पाठीशी उभा राहिला
डगमगता मी या जग जंजालात
स्नेह देण्या मजला तूच आला
आपल्या दोघांच्या प्रीतिचे
अपत्य रुपी आठवण आहे
त्याच्या हितातच आपले हित
त्याच्यातच आपले अस्तित्व पाहे
असेल मी तुजसंगे जीवनभर
येवो संकटांचा पहाड मोठा कितीही
जन्मोजन्मी नाही विसरणार तू
मजला आणि माझी प्रितीही

