STORYMIRROR

Varsha Patle Rahangdale

Romance

4  

Varsha Patle Rahangdale

Romance

साथ

साथ

1 min
153

स्वप्ने रंगविली संसाराची

पूर्णत्वास नेशील का?

आयुष्यात तुझ्या मला

थोडी जागा देशील का?


प्रित तुझी माझी

छान बहरून येईल का?

संसारवेलीवर तुझ्या

मला उमलु देशील का?


तुझ्या अंगणातील बागेत

मला फुलू देशिल का?

सोसाट्याच्या वाऱ्यापासून

बचाव माझा करशील का?


वसंतातील गारव्यासारखा

अंगात माझ्या भिनशिल का?

ग्रिष्मातील रखरखत्या उन्हात

सावली बनून जाशील का?


संसारात तुझ्या साथ देईल

दुःख आपले माझ्याशी वाटशिल का?

तुझ्याच साठी फक्त मला

दोन अश्रू गाळू देशील का?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance