STORYMIRROR

Manisha Awekar

Romance

4  

Manisha Awekar

Romance

साथ तुझी हवी प्रिये

साथ तुझी हवी प्रिये

1 min
402

जीवनाच्या संधिकाली

लागे भास्कर अस्ताला

बोल अंतर्मनातले

हवे आता बोलायला


आयुष्याचा लेखाजोखा

आता विसरुन जाऊ

साथ तुझी घट्ट हवी

जग नव्याने न्याहाळू


रहाटगाडगे नको

संसाराचे अधेमधे

मनामनातील नाते

उमलावे शब्दांमधे


हास्यघन विहरावे

झरा अक्षय सुखाचा

वेळ पळे द्रुतगती

सखे बोल अंतरीचा


प्रीत दुनियेत रमू

संगतीत धुंद हवा

गंधाळेल प्रीत नवी

हात तुझा हाती हवा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance