साथ मैत्रीची...
साथ मैत्रीची...
मी नसतानाही मला भेट
कट्ट्यावर आपल्या खेळ
भावनांना मात्र घाल आवर
नि रडतानाही कर खेळ
पण साथ तू सोडू नकोस
जरी मी नाही तुझ्या जवळ
मैत्रीला आपल्या मनातून जप
स्पंदनांना अलगद स्पर्शून जा
नि माझ्यात कधीतरी रम
कधी स्वतःलापण हसव
कधी माझीही धर साथ
आठवणींना कर आधार
कधी येत चल भेटायला
वाट पाहते तुझी साथ
मैत्रीला घाल एकदा साद...

