साथ हवी
साथ हवी
साथ हवी तुझी हात तू देशील का?
विराण या जीवनात रंग तू भरशील का?
भंगलेल्या आयुष्याला तुज रूपाने पालवी फुटेल का?
ओसाड आहे मन माझे ओठी हसू फुलवशील का ?
सांग ना रे आयुष्यभर तुझी सोबत मला मिळेल का.?
तुझ्या सोबतीच्या आठवांचे...
क्षण मी मनी जपले त्या क्षणांची अनुभूती तू मला पुन्हा देशील का?
अव्यक्त भावनांना माझ्या तुझ्या अट्टाहासाने शब्दरूप दिले
ती ओढ जपशील ना सांग ना रे माझ्या चुका माफ करून तू मला आपल मानशील का?
शब्दांचे घाव जे मी..
तुला दिले ते विसरून मिठीत तू घेशील ना सांग ना रे
एकाकी या अनामिकेला तुझ्या हृदयात जागा देशील का?
Happy Hug Day
मन एक लेखणी

