STORYMIRROR

Vijay Sanap

Inspirational

3  

Vijay Sanap

Inspirational

साता जन्माची गरीबी

साता जन्माची गरीबी

1 min
216

   साता जन्माची गरीबी

रोज करतो मजुरी

घाम गाळूनच होई

संध्याकाळ ती साजरी ।।


टिचभर  पोटासाठी

बालपणी फोडे खडी

आम्हा कसली रे शाळा

नाही कुठे बाराखडी ।।


हाती घेऊन हातोडा

फोडे दगड उन्हात

निरागस बालकाच्या

काय असेल मनात ।।


असे जवळ सावली

नाही विसावा जीवाला

पोट  भरणे  सोडून

कसं बसू सावलीला ।।


बाप गेला देवा घेरी

माय नेहमी आजारी

तिच्या दवाखान्यासाठी

करे  उन्हात  मजुरी ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational