" सारं काही...हं, ' सार ' आहे. "
" सारं काही...हं, ' सार ' आहे. "


गुंग होतो एका विचारात, बोलायचं होतं मनातलं 'सारं...'
जसं अळणी पदार्थाला मीठ असतं संसारातील 'सार...'
गुंफत होतो प्रत्येक अतूट शब्दांची माळ; कधी ज्वलंत, कधी मायेची, प्रत्येक क्षणांची....
मांडत होतो साऱ्या आयुष्याचं गणित; ओंजळीत, मनात, विचारात, आणि साऱ्यात ...
अगदी रोख-ठोक . . .
प्रत्येक पाऊल ह्या पिढीने हुशारीने पुढे टाकलंय...
दुसऱ्याचं काय सांगू मे स्वतःला बदलताना पाहिलय...
नाटकातल्या सोंगा पेक्षा मी इथे पैशालाच सोंग घेताना पाहिलय...
दुसऱ्यावर जीव नसताना सुद्धा मी पैशासाठी जीव लावणारा पाहिलय...
धूर्त कपटी. . .
म्हणतात हृदयात प्रेम असेल तर सर्वत्र मित्रच...
पण एका घरासाठी मी दोन सख्या भावांना भांडत
ाना पाहिलंय...
पक्के वैरी घरात जन्मले मग दुसयाच्या घरात काय वाकून पाहू...
रक्ताचं नातं क्षणात संपताना पाहिलंय...
बेचिराख उध्वस्त...
लोकं म्हणतात सारा काही खेळ असतो नियतीचा...
लहानपणी ह्याला नाव देतात हा तर खेळ आहे भातुकलीचा...
संसार करायचा अट्टाहास असतो सुखाचा...
पण, मला वाटतं हा खेळ आहे साध्या सुखकर विचारांचा...
सरळ सोप्प...
लहानग्यांना सुद्धा कळतं त्यांचा आनंद त्यांना मिळणाऱ्या प्रेमात असतो...
तरुणपणीचा आनंद त्यांना मिळणाऱ्या इतरांच्या निखळ मैत्रीत असतो...
वृद्धापकाळातील आनंद हा त्यांच्या अख्या अनुभवाच्या शिदोरीत असतो...
आयुष्यभराच्या पुंजीच गणित मी इथेच मांडलंय...
शांतता आणि प्रेम