सारे काही सत्तेसाठी
सारे काही सत्तेसाठी
आम्ही करतोय इथे
सारे काही सत्तेसाठी,
प्रजेलाही धरतोय
आम्हीच मतासाठी वेठी!
देतो त्यांना आम्ही दर
पाच वर्षांनी पैसा अन् दारू,
त्यानंतर मात्र आम्ही
आमचे सारे घर भरू!
यांना काय कळते तरी
देशाचे राजकारण,
याचं तर आहे रोज
भाव आणि जातीसाठी मरण!
यांचा तर करतो आम्ही
रोजच आमच्यासाठी वापर,
आणि देतो आश्वासन ही
आहे आम्हीच तुमचा आधार!
करतो आम्ही प्रजेचा विकास
एखाद्या न वाढलेल्या गाजरासारखा,
आणि तोही बघतो आमच्याकडे
भिजलेल्या मांजरासारखा!
करतोय आम्ही दिवसेंदिवस
कित्येक मोठे पाप,
तरीही मोठ्या मनाचा हा समाज
करतो मोठा मनाने माफ!
