STORYMIRROR

Savita Jadhav

Tragedy Inspirational

4  

Savita Jadhav

Tragedy Inspirational

सारा आटापिटा भाकरीसाठी

सारा आटापिटा भाकरीसाठी

1 min
223

किती करावा लागला होता अट्टाहास,

एक वेळच्या भाकरीसाठी खास,

इलाज नव्हता कधी मजुरीशिवाय,

भागवायची होती भुकेल्या पोटाची आस


इवली इवली पाखरं घेऊन काखेला,

फिरत असे ती काट्याकुट्यातून रानोमाळ,

कधीकधी धरावा लागला तिला पोटासाठी,

बैलजोडीच्या जागी नांगराचा फाळ


भाकरतुकड्यासाठी कधी भटकली दारोदार,

कधी मिळायचा मोबदला तर कधी मागायची उधार,

कधी इवलीशी चिमणपाखरं पण घ्यायची हाताशी,

लावायची त्यांनाही कामाला राहू नये म्हणून उपाशी


खडतर आयुष्याची वाट ती आता कुठे सावरली,

झेलत कितीतरी संकटे तिनं लेकरं कशीबशी जगवली,

आठवून साऱ्या आठवणी डोळ्यांना लागते धार,

करावा लागला सारा आटापिटा भाकरीसाठी फार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy