STORYMIRROR

Shila Ambhure

Inspirational

3  

Shila Ambhure

Inspirational

सांजवेळी

सांजवेळी

1 min
544


दूर दूर तिथे

क्षितिजा जवळी

बघते मी वाट

तुझी सांजवेळी


मित्रही चालला

आईच्या कुशीत

हसतो गालात

येवोनि खुशीत

आनंदे गाते मी

प्रेमाची चारोळी।।1।।


जाहल्या धूसर

आता दाही दिशा

डोकावते कशी

पानांतून निशा

संधिकाली बघा

केशरी रांगोळी।।2।।


दिवे उजळले

चूलीही पेटल्या

फुलांनीही बघा

पाकळ्या मिटल्या

हळूच पेंगते

पालवी कोवळी।।3।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational