सांजवेळी जीवनाच्या..!
सांजवेळी जीवनाच्या..!
जीवनाची माझ्या आता
सांजवेळ होत आली
तरी बाळा तुझ्याशीच
आहे नाळ जोडलेली
ताज्या आहेत अजून
तुझ्या बाळ आठवणी
पण बनुन राहिल्या
नुसत्याच साठवणी
झालं आकाश ठेंगणं
जेव्हा ऐकलं मी आई
भर पावसात होती
गंधाळली मनी जाई
यौवनात मग बाळ
दुरावलास का बरं
कधीतरी दूर जाता
आठव मागचं सारं
