STORYMIRROR

VINAYAK PATIL

Abstract Others

3  

VINAYAK PATIL

Abstract Others

सांजवेळ

सांजवेळ

1 min
228

सांजवेळी सांज समयी 

रवी बुडाला पर्वता मागुनी

नयन तृप्त झाले दृश्य पाहूनी 

आशेचा किरण दिला जगण्यातुनी 


सांजवेळी पसरे अंधार 

काळोखात लपती झाडे 

गुण्यागोविंदाने गुणगुणती 

वार्‍यासवे मैत्रीचे धडे  


रवि अस्तला सांजवेळी 

किरणांनी नटले आकाश

नभ अडवता मार्ग तयांचा 

नभा मागून चंद्र देई प्रकाश 


निरभ्र आकाश साथीला 

सुगंध दरवळे मातीचा 

मेघांची गर्दी पाहताक्षणी 

संवाद ऐकू येई हवेचा 


जपन्या निसर्गाचा ठेवा 

एकमेका सहाय्य करु या

सर्वांच्या मदतीने आपण

जीवनाची सांजवेळ जगू या 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract