Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ajay Nannar

Romance

5.0  

Ajay Nannar

Romance

सांज प्रीतीची

सांज प्रीतीची

1 min
523


सायंकाळच्या हवेत पसरतोय

धुंद गुलाबी गारवा.....

माझ्या मनातही बहरतोय

तुझ्या प्रेमाचा अर्थ नवा....


संध्याकाळची वेळ पुन्हा ही,

निळी होऊन नटते...

सुगंधित ही रातराणी

तुझ्या साठीच गं सजते....


कातरवेळी तुझ्या सोबतीत

नवी प्रित बहरून येते....

जशी निळ्या आकाशातून,

सांज नारिंगी डवरून येते....


सांजेच निमित्त करून,

ती सावलीही मजपासुन दुरावू पाहते..

एक तुझी आठवणच काय ती,

सदैव मनातच घर करुन राहते....


आरक्त नेत्र, अन फुललेला श्वास,

चौफेर पसरुनी लालीमा,

त्या सांजेलाही जणू लागलेली मिलनाची आस...


स्वप्न मिलनाचे रूजताना,

किनारे रेतरांगोळी सजले होते...

काही तारेही नभात तेव्हा,

निखळण्यास धजले होते....


माझ्या आयुष्यात फुललेली,

प्रेमाची एक नवी हिरवळ,

अन् सहवासच तुझ्या,

मनात भरलेली,

मैत्रीच्या सुगंधाची एक दरवळ...


पुन्हा त्या भावनांनी आेथंबून,

मनातून आेथंबून पाहावं...

वेड्या माझ्या प्रेमपावसात,

तू चिंब चिंब भिजत राहावं...


तुझ्या आठवणीत धुंद मी,

अलगद पाण्यात मीटत असतो....

खरं सांगू....

त्याचवेळी मी तुला,

अगदी नव्याने भेटत असतो...


बघ कधी स्वतःच स्वतःला निरखून,

तुझ्या रूपातच मी दिसेन....

हळूवार पापण्या मिटून घेशील,

तेव्हा जाणवेल तुझ्या रूपातच मी असेन....


विखुरलंय मी माझं प्रेम,

तुझ्या सर्वच त्या वाटांवरती.....

लहरू दे नौका तुझ्याही भावनांची स्वैर,

उधानलेल्या माझ्या हृदयाच्या लाटांवरती....


बंध जुळले असता....

मनाच नातंही जुळायला हवं

अगदी स्पर्शातूनही

सारं सारं कळायला हवं


जिथे स्वार्थाच्या उग्रतेचा गंध नसतो....

जिथे मनाचा कलुषित रंग नसतो

जिथे फक्त एकमेकांचा अतूट संग असतो आणि,

जिथे नात्याला कधीच कोणताच अंत नसतो....


अल्लडशा कोण्या क्षणी,

तुझी माझी गळाभेट व्हावी....

तळमळणाऱ्यी दोन हृदयांची भेट,

अगदी थेट व्हावी....


घे हाती हात माझा,

जगीचं सारं सुख तेव्हा तुझं असेल....

माझ्या प्रेमाच्या त्या सीमेपुढे,

अवघं ब्रह्मांडदेखील त्यावेळी खुजं असेल....


ढगांच्या चाळणीतून,

अवचीतच चांदवा धरतीस येतो....

त्याचवेळी कसा तुझ्या आठवांचा सागर,

माझ्या मनात भरतीस येतो....


चंद्रिकेस बिलगू पाहणारा,

तो चांद जसा.....

मी ही तुझाच,

तसाच काहीसा......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance