सांज होता
सांज होता
सांझ होता क्षणिच सखे
तुझे कंकण वाजे भारी गं
मन होई गं चिंब माझे
भेटीची दाटे ती ऊभारी गं
फुल छळते दिवसा तुजला
रात हेाता अंधार सखे
तू खुशाल नीज मांडीवरी
मी गोजांरते तुझे केस सखे
वेदना तुझी छेड जरा
ह्द्यातले बोल बोल गं
सांज हेाता क्षणिच सखे
तुझे कंकण वाजे भारी गं
नक्षञाचं देणं तुजला
भरली कणसावानी तू
झुलते पाठीवरी तुझ्या
वेणी नागमोडी गं
नदी वाहते संथ तशी
तुझीच मंजुळ वाणी गं
सांज होता क्षणिच सखे....
प्राशून श्वास तुझे मी
एकरुप झालो असा
कोण मी अन कोण तू गं
फरक दिसेना मला कसा
तुझे मुख पाहुनीच गं
जगत आलो जन्म नवा गं
सांज होता क्षणिच सखे..
तुझे कंकण वाजे भारी सखे

