STORYMIRROR

Pandit Warade

Tragedy Others

2  

Pandit Warade

Tragedy Others

सांगून गेला पाऊस

सांगून गेला पाऊस

1 min
179

काल अचानक धुमाकूळ हा घालून गेला पाऊस

साद कृतीतून मानवतेला देऊन गेला पाऊस।।धृ।।


लहान मोठा काळा गोरा रंक राव कुणी नसे

महापुराच्या विळख्यामध्ये सारे अडकलेत कसे

सर्व धर्म समभाव असावा सांगून गेला पाऊस।।१।।


घरासहित सामान घरातील होते नव्हते नेले

डोळ्यादेखत गुरे ढोरे धन दौलत वाहून गेले

हाती कुणाच्या काहीच नसते दावून गेला पाऊस।।२।।


भीमा गोदा कृष्णा कावेरी पंचगंगा बिथरल्या

बेलगाम, बेफाम होऊन सुसाट धावत सुटल्या

करा मोकळा मार्ग नद्यांचा सांगून गेला पाऊस।।३।।


निसर्गचक्रामध्ये नसावा हस्तक्षेप मानवा

विध्वंसाचा रचला जातो इतिहास हा नवा 

धडा माणसाला पुन्हा शिकवून गेला पाऊस ।।४।।


चहू दिशांनी ओघ मदतीचा सुरू जाहला

'एक होतो एकच राहू' भाव उभा राहिला

मानव हृदयामधला देव जागवून गेला पाऊस ।।५।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy