STORYMIRROR

sarika k Aiwale

Romance Inspirational Others

3  

sarika k Aiwale

Romance Inspirational Others

सांग ना दर्पणा

सांग ना दर्पणा

1 min
240

भाव अनामिक ओढ मनास ती

सदा कानी बोल असे का सोबती 


सांग ना दर्पणा कोण ती नजर 

भावे तुला अशी की भुलतो भ्रमर 


मन तया संगती भासते जगा वेगळे 

दर्पणातही रुप हे दावते का आगळे 


विश्वास तो ऐहिक मनाचा घेता ताबा 

हसरे भाव खुलता जगण्यास शोभा 


आरसा हा दावतो निखळ सत्य सदा 

परी ना दावता येते अंतरीची ती अदा 


अंतर्मनाचे सौदर्य दावतो जो सारा 

तोच आत्मिक विश्वासाचा आरसा खरा 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance