सांग मला
सांग मला
हा तरु किती बहरला,
पान फुलांनी नटला,
चैत्राची पालवी,
बघ कोवळी कोवळी,
त्यात तू उभी,
जशी इंद्रधनूची छडी,
काय तू चमकती चांदणी.?
सांग मला...
ही बघ नदी, खळ खळ वाहते,
काय मनीचे सांगते?
का ती प्रेम गीत गाते?
कान देऊन तू ऐक जरा...
ती तुला काय सांगते?
सांग मला...
हे चांदण्यांनी गगन चमकते,
चंद्र का डोकावतो,
ही चांदणी रात खुणावते,
काय तुला सांगते?
सांग मला...
हा पवन शीळ घालतो,
फांदीला धरून हालतो,
का तो फांदीला झटतो?
सांग मला...
ती बघ कमळाची कळी,
दिसते तुझ्यासारखी,
उमलतील पाकळ्या आता,
पाहू पराग त्याचे,
तू थांबशील का थोडी,?
सांग मला...
तुझ्यात मन रमले,
तुझ्यावीण जग रिते,
तू सोबत राहशील का?
कळीला फूल देशील का?
सांग मला...

