सामर्थ्य...
सामर्थ्य...
कधी नियतीपुढे हतबल होण्यामध्ये
कशाला असामर्थ्याची कुरघोडी
हिशोबनीस कुकर्माची सोडून संगत
निश्चयाने करावी धाडसी आघाडी
नियतीचे हिशोब चुकते करायला
एकमात्र सामर्थ्याची भासते गरज
नसावा हिंमतीच्या जोरावर लढता
जगण्यात अडथळ्यांचा गैरसमज