Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Nikita Shelgikar

Drama Fantasy

2  

Nikita Shelgikar

Drama Fantasy

सामान्य माणसा

सामान्य माणसा

1 min
7.1K


अरे सामान्य माणसा अजून कसा रे तू निवांत,

भरवसा ठेवू नकोस माणुसकीवर तिचा तर होत चालला आहे अंत ||१||


जीवनावश्यक गरजा भागवता भागवताच तुझा जीव येतो मेटाकुटीला,

वाढत्या महागाईचा मार तर रोजच बसतो आहे तुझ्या पाठीला ||२||


कसा सहन करतोस रे तू हा अन्याय अत्याचार??

येथे तर सगळीकडे दिसतो नुसता भ्रष्टाचार ||३||


या जगात काहींना तर कळते नुसती पैशांचीच भाषा,

त्यांच्याकडून पैश्यांशिवाय काम होऊ शकेल ही सोडून दे आशा ||४||


पैश्याच्या हव्यासापोटी लोक काहीही करायला तयार असतात,

पण त्यांच्या या वाईट कृत्याची शिक्षा निरपराधी लोक भोगतात||५||


यातील वाईट लोक कोण हे कळले असेलच तुला आता आणि हे निरपराधी,

अरे हे तर 'अन्याय सहन करणारे आपण' आणि भरडली जाणारी ही सामान्य जनता ||६||


एवढं सगळं होत असताना देखील तू इतका निवांत रे कसा ??

उठ लढ सिंहासारखा, होऊ नकोस तू एक भित्रा ससा ||७||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama