Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Nikita Shelgikar

Drama

3  

Nikita Shelgikar

Drama

घर

घर

1 min
7.8K



'घर' हे फक्त चार भिंती,एक छप्पर आणि बाजूने कुंपण इतकंच मर्यादित नसावं,

तर त्यात वास्तव्य करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या सुखदुःखात साथ देणार असावं ||१||


कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या व्यक्तींना हसत हसत निरोप देणारं असावं,

आणि काम संपताच या व्यक्तींना परत स्वतःची ओढ लावणारं असावं ||२||


गरीबाची झोपडी, श्रीमंतांचा बंगला तर पक्ष्याचं घरटं,नावं फक्त वेगवेगळी,

पण त्यात आश्रयाला असणाऱ्या प्रत्येकाचं रक्षण करण्याचं काम करत असत हे एकटं ||३||


काहींना सतत या घरात बसून राहिलेलं आवडत नाही,

तर काहींना आपलं घर सोडून दुसरीकडे कुठे जाऊ वाटत नाही ||४||


लहानपणापासूनच प्रत्येकाची या घराबरोबर एक नाळ बांधली गेलेली असते,

आपण जसे मोठे होत जाऊ तशी हि नाळ हळूहळू घट्ट होत जाते ||५||


जीवनात या घराला अनन्यसाधारण महत्त्व असतं,

घर कसंही असो सगळ्यांनाच आपलं घर खूप प्रिय असतं ||६||


Rate this content
Log in