स्वप्ननगरीचा राजा महाराष्ट्र
स्वप्ननगरीचा राजा महाराष्ट्र


विविधतेने नटलेल अस महाराष्ट्र राज्य आहे आपल,
डोंगर, नद्या, सागर तसेच हरित भूमीने आहे व्यापलेल.
बाकी राज्यातील लोक महाराष्ट्रात येतात हाताला काम मिळेल या आशेने,
आलेल्या प्रत्येकाला आपलसं करून घेत हे राज्य मोठया हौसेने.
येथील प्रत्येक जिल्हा कशाच्या न कशाच्या उत्पादनात अग्रेसर आहे,
आपल्या उत्पादनांचा असलेला दर्जा टिकून राहील हे प्रत्येक जण काटेकोरपणे पाहे.
अनेक थोर संत, कवी, वीर पुरूष या महाराष्ट्रात जन्माला आले,
त्यांच्या सत्कार्याने आपल्या राज्याचे नाव कानाकोपऱ्यात पसरले.
महाराष्ट्रात विविध कलाप्रकार पहायला मिळतात