Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Nikita Shelgikar

Inspirational

0  

Nikita Shelgikar

Inspirational

डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम

डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम

1 min
850


डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम


विद्यार्थीप्रिय वक्ता, ध्येयवादी व्यक्तिमत्व आणि एक ज्येष्ठ वैज्ञानिक ,

अचानक निघून गेल्याने शोकसागरात बुडाला भारतातील प्रत्येक नागरिक ||१||

डॉक्टर कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी रामेश्वरम मध्ये झाला,

आणि २७ जुलै २०१५ ,एकादशीच्या दिवशी त्यांनी शिलॉंग मध्ये अखेरचा श्वास घेतला ||२||

नावाड्याच्या घरात जन्मलेले कलाम पितृछत्र हरपल्यावर पुढे कष्ट करून इंजिनीअर झाले,

नंतर अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना डॉक्टर कलाम यांनी राष्ट्रपतीपद भूषविले ||३||

अनेक पुरस्कारांबरोबर 'भारतरत्न' सारखा सर्वोच पुरस्कार मिळालेला असूनदेखील त्यांनी कधी गर्व नाही बाळगला,

संशोधन क्षेत्रात मात्र स्वतःचा असा वेगळा ठसा त्यांनी उमटवला ||४||

वेळोवेळी डॉक्टर कलाम तरुण पिढीला मार्गदर्शन करत राहिले,

भारत २०२० मध्ये महासत्ता होईल हे स्वप्न त्यांनीच तर आपल्याला दाखविले ||५||

ध्यानी-मनी नसताना अचानकच तुम्ही जगाचा निरोप घेतला ,

पण स्वप्न पहा, मोठी ध्येय बाळगा असे विचार आम्हा सर्वांसमोर ठेऊन गेलात ||६||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational