Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Nikita Shelgikar

Drama Fantasy

3  

Nikita Shelgikar

Drama Fantasy

मन

मन

1 min
6.9K


मन म्हणजे असे ठिकाण ज्यामध्ये असतो सुखद-दुःखद आठवणींचा भलामोठा साठा,

जिथे एक विचार करता करता, दुसऱ्या विचाराला कधीच फुटलेला असतो फाटा ||१||


क्षणाक्षणाला अनेक विचार येत असतात या मनात,

आणि याच विचारांमध्ये माणूस इतका गुंतून जातो की बाकी काही नसत त्याच्या ध्यानात ||२||


असे हे मन आनंदी असेल तर तो आनंद लगेचच दिसून येतो,

आणि उदास असू तर ते तरी कुठे लपवू शकतो ||३||


आपल्या याच मनाच्या दोन बाजू असतात ,

फारच कमी बाबतींमध्ये त्या एकदुसऱ्याशी सहमत असतात ||४||


जेव्हा त्या एकमेकांशी सहमत असतात तेव्हा ते काम १००% सफल होतेच ,

आणि जेव्हा दोघी वेगवेगळे पर्याय सुचवतील तेव्हा काहीतरी गडबड असतेच ||५||


योग्य पर्याय निवडला तर त्याची निश्चितच चांगली फळे मिळतील,

अयोग्य पर्याय आत्मसात केल्यास येणारे भोग भोगावे लागतील ||६||


ऐकावे जनाचे करावे मनाचे या पंक्तीचा प्रत्येक निर्णय घेताना अवलंब करू,

उशिरा का होईना पण त्या निर्णयांच्या जोरावर निश्चितच विजय मिळवून दाखवू ||७||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama