Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Nikita Shelgikar

Tragedy

3  

Nikita Shelgikar

Tragedy

२६ /११ दहशतवादी हल्ला

२६ /११ दहशतवादी हल्ला

1 min
14K


२६/११ ही तारीख पाहताच आठवतो मुंबईवरील तो दहशतवादी हल्ला,

ज्यामध्ये अनेक निरपराधी लोकांनी आपला जीव गमावला ||१||


घरातून बाहेर पडताना त्यांना वाटले पण नसेल की आपल्यावर आज अशीही येईल वेळ,

काही कळायच्या आतच नियतीने खेळला या भोळ्याभाबड्या जनतेशी असा हा मोठा खेळ ||२||


कोणाचे बहीण-भाऊ तर कोणाचे आई-वडील या हल्ल्यात मारले गेले,

क्षणार्धात या मुंबापुरीचे होत्याचे नव्हते झाले ||३||


प्राण पणाला लावून अशोक कामटे, हेमंत करकरेंसारखे देशप्रेमी शत्रूंशी लढले,

पण मुंबईला शत्रूंपासून वाचवता वाचवता त्यांनी स्वतःचे प्राण गमावले ||४||


हा प्रसंग आठवला की लगेचच येतो अंगावर काटा,

या दुःखद आठवणींचा प्रत्येकाच्याच मनाच्या कोपऱ्यात आहे एक छोटासा साठा ||५||


या हल्ल्यानंतर हळूहळू मुंबईने स्वतःला सावरले,

काही काळ जाताच सर्वांनी या नगरीला पूर्वपदावर आणले ||६||


मुंबईला पूर्वपदावर आणण्यात मुंबईकरांचाच आहे सिंहाचा वाटा,

चला तर मग काढून टाकू या दहशतवादाचा मुळापासून काटा ||७||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy