STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational Others

3  

Pandit Warade

Inspirational Others

साजणी

साजणी

1 min
187

भावनांचा कोंडमारा फार झाला साजणी

वेदनांचा काळजाला भार झाला साजणी


मोगरा केसात ओल्या माळला आहे कुणी

काळजावर या सुगंधी वार झाला साजणी


दीप वंशाला हवा हा ध्यास होता अंतरी

मारली कन्या कसा अंधार झाला साजणी


शासनाच्या योजनांचा बोलबाला चालला

आजचा माणूस हा लाचार झाला साजणी


एक साधासा विषाणू माणसाला मारतो

त्रासला माणूस अन् बेजार झाला साजणी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational