साहित्य पालखी
साहित्य पालखी
शब्दांची सोबत /भावना गुंफली/
लेखणीत आली /काव्यफुले. १.
सुमनांचा हार /ग्रंथांची संपदा/
सहवास सदा/ ज्ञानामृत. २.
अखंड संगत /वैभव सुंदर/
प्रचंड भांडार /नित्य काळी ३.
अवीट गोडीचा/ साहित्य प्रकार /
जीवन आधार /पुरोगामी. ४.
उत्तम लेखक /श्रवण मनन/
सतत वाचन /संस्कृतीचे. ५.
अनुभव रंगे /कधी सामाजिक
कधी प्रासादिक/ साहित्याचे. ६.
स्कंधाशी शोभला / भार आनंदाचा/
साहित्य प्रेमींचा/ मनातला. ७.