STORYMIRROR

Stifan Khawdiya

Inspirational

3  

Stifan Khawdiya

Inspirational

साद

साद

1 min
177

आई तू सांग ना बाबांना.

मला शिकायचय अजून.

नको ग माझ्या लग्नाची घाई.

का?मी त्यागावे स्व- जीवन.


आई थोड्यावेळ का होईना.                                                                       

आईपण बाजूला ठेव.

स्त्री पणाला जागून.

एका स्त्रीला मदतीला धाव.


नाही शोभत मला अस बोलण.

पण तुझ्या अस्तित्वाची होळी पाहून.

नको वाटत असलं असह्य जीण.

क्षणा क्षणाला सर्वस्व त्यागण.


मला माझ्या अस्तित्वाला.

एक वेगळीच ओळख द्यायची

या घातकी दुनियेत माझी.

हिम्मतीची छाप पाडायची.


आई बाबा मी तुमचचं पाखरु.

नका कातरू पंख माझे.

घेऊद्या मला भरारी.

मी नाही हो तुमच्यासाठी ओझे.


कराल ना? मदत मला.

जमवा सोयरीक माझ्या अस्तित्वाशी

नका बळी पडू रुढीला 

सहमत व्हा ना माझ्याशी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational