STORYMIRROR

Seema Pansare

Romance

3  

Seema Pansare

Romance

रुसवा

रुसवा

1 min
144

नको रुसवा मैत्रिणी

कर मन मोकळे हात धरोनी


सोड अबोला आता तरी

किती करू ग तुला विनवणी


काय चुकले काय बोललो मी

नाही मज ठावे, सांग तरी


चार दिसांचे हे जीवन

उदास झाले बघ हे मन


सूने सुने हे ग अंगण

कर जरा गीत गुंजन


मला ठावे राग तुझा लटका

देतेस तू मानेला हलका झटका


हा बघ हासलीस गाली

नयनात चमक न्यारी



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance