होळी
होळी
होळीचा हा सण
घरा घरात आज
हमखास पुरण पोळी. पण सखुच्या घरात आज अन्नाचा कण नाही
गरिबीने खचलेली ती माऊली फुटपाथवरील जात होती.
आज आपल्या लहानग्याला काय भरवावे हा विचार तिच्या मनात घोळत होता रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या कचरा पेटीच्या कठड्यावर एकाने रात्रीच्या शिळ्या भाकऱ्या आणून टाकल्या. त्या माऊलीने तो दिसेनासे होताच पटकन पदराआड लपवल्या आणि धापा टाकतच घर गाठले. घरात शोधा शोध करून गुळाचा खडा मिळवला .तो फोडून भाकरी कुस्करून त्याचे मस्त गोल लाडू बनवले ते पाहून लहानग्याला आनंद झाला अन्न हेच परमब्रह्म मग ते शिळे का असेना.