कविता
कविता
1 min
196
जीवन हे दोन घडीचं
नाही काही भरवशाचं
वाटलं थोडं लोळावं,
पहाटे उठून पळावं
पळून घे
मस्त ,निवांत गाण्याची धून
गुण गुणावी थेट हृदयातून
गावुन घे
त्या संगीताच्या तालावर
जरा वाटलं थिरकावं
डोलुन घे
संसारात असतेस सदा व्यस्त
सर्वांचेच करतेस सारे मस्त
सारे करता सावरता दिन, माहे, वर्ष सरेल
पळू, गावू ,डोलू म्हणता सारे राहून जाईल