करार
करार
या ओठांवरचा थरथरता, थरार तुझ्यामुळे
नजरेने केला नजरेशी, करार तुझ्यामुळे
कशी अवचित दिसली मज तू एकदा
मनात वसलीस तू
मी शोधून थकलो तुला किती अन्
पुन्हा गवसलीस तू
हृदयाची छेडली अशी, सतार तुझ्यामुळे
नजरेने केला नजरेशी, करार तुझ्यामुळे
किती वाटेवर मजनू तुझिया
मलाच पटलीस तू
येशील का तू मज भेटाया
क्षणात म्हटलीस तू
जिंकलो कशी ही आज बदलली
हार तुझ्यामुळे
नजरेने केला नजरेशी, करार तुझ्यामुळे
आकाशाहून ऊंच आता तुज
घेऊन जाईन मी
तार्यांच्याही मोहक माला
तुजला वाहीन मी
ये जीवनात ही, रंगबेरंगी बहार तुझ्यामुळे
नजरेने केला नजरेशी, करार तुझ्यामुळे

