STORYMIRROR

Suvarna Patukale

Romance

3  

Suvarna Patukale

Romance

जीव कसा जडला न कळे

जीव कसा जडला न कळे

1 min
189

जीव कसा जडला न कळे

कशा धुंद झाल्या दिशा

का झुरते मन, थरथरते तनू

जाहले बावरी

सावर रे मज, पाहूनीया तुज

बहरले अंतरी

दिवस कसा सरतो न कळे

कधी जाहली ही निशा

जीव कसा जडला न कळे

कशा धुंद झाल्या दिशा


लाट प्रीतीची, भाव मनातील

उसळते सागरी

रवी किरणांनी विकसित झाली

कमलिनी ज्यापरी

रात कशी सरते न कळे

आठवणी या अशा

जीव कसा जडला न कळे

कशा धुंद झाल्या दिशा


रंगबिरंगी फुले उमलली

होऊनी लाजरी

भ्रमर ही भुलला रंगही खुलला

कोठूनी अंबरी

बंध कसे जुळती न कळे

रेशीमगाठी जशा

जीव कसा जडला न कळे

कशा धुंद झाल्या दिशा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance