रम्य सकाळ ती..
रम्य सकाळ ती..
एक रम्य सकाळ
तुझी माझी
तुला मला स्वप्नातून
जागी करणारी सरली ही रात्र
तुला मला कष्ट देणारी
उबदार देहांला गारठले आता
शितल झुळकेन शांत करणारी
कोवळ्या किरणाच्या
गर्मीतून रोमरोमात शिरणारी..
पुन्हा.....मग
एक सकाळ उगवली
प्राणयास जागवून
भावना मनीच्या चेतवनारी
अंधारात घडले ते स्वप्न सये
या मुलायम प्रहरी आठवती
एक सकाळ आहे सखे
स्वप्न नयनी तुझ्या माझ्या
पुनःएकदा साकारणारी
तू मला-नी-मी तुला
नव्याने एकमेकां ओळखणारी
स्मृतीत राहील अश्या
गोड अनुभव देणारी..रम्य सकाळ ती..

