ऋण
ऋण
मला नकोय तुझी साथ
माझ्या दुःखात
मी माझं दुःख सहन करू शकते
तुला होणार्या दुःखाशिवाय...
माझे अश्रू बघण्याआधीच
लवशील पापण्याना
तुझ्या डोळ्यांतला आनंद
वाहून गेलेला पहिला जाणार
नाही माझ्या नजरेने...
तुझ्या परीने जपत जा स्वतःला
माझी काळजी घेताना
तुला होणारा त्रास माझ्या
वेदनेत भर घालतो..
प्रेम करणंही आता जरा
कमी-कमी करत जा माझेवरच
इतरांना तुझ्या प्रेमाची हाव
माझ्यापेक्षा कमी नाहीये...
आणी.. हे सारं पाळायचे वचन
मागणार नाही मी तुझ्याकडे
मला आधीच तुझे कितीतरी ऋण
फेडायचे राहिलेत गेल्या जन्माचे..
