STORYMIRROR

#सह्याद्री निरन

Others

3  

#सह्याद्री निरन

Others

आभास

आभास

1 min
226

एका शांत संध्याकाळी अचानक...

ढगांची मैफिल भरावी

विजांच्या रागालापाने

मनातील वादळांना

चेव फुटावा आणि .....

तितक्याचआक्रांताने

तुला साद घालावी

वाऱ्यावर झुलत्या फुलांना

काट्यांच्या स्पर्श होतो तसाच तुझ्या

आठवणीचा स्पर्श मनाला बोचतो तेव्हा ...

पाघळणारे...ते अश्रू होत ...नव्हे मधुरस.

तुझ्या अस्तित्वाची उणीव मला

पुन्हा एका शून्यात घेऊन जाते.

जिथे खूप अंधार कोंडून

ठेवलेला आहे अश्या विचारांच्या गर्तेत

मी प्रतीक्षा करत असते ...

दोन्ही बाजूंना खोलून

तुला ज्याठिकाणी तू नाही

परी तुझा आभास असेल

त्या बंद पापण्याखाली

गर्द काळोखात उघड्या डोळ्यानी

शोधायची अयशस्वी प्रक्रिया.....

आपसूक घडत राहते......


Rate this content
Log in