जीवन एक संघर्ष
जीवन एक संघर्ष
तुला पाहताना प्रिया
हरवते भान सारे,
तुझ्या मनात शिरता
कुठे मीच माझी उरे...
असे श्वासात गुंफिले
जन्मोजन्मी सर्वस्वाने,
एकमेकां साथ देऊ
अंतरीच्या सारस्वाने...
तुला पाहताना फक्त
प्रितभाव मनी माझ्या,
शहारते अंग-अंग
&n
bsp; मनातल्या स्मृती ताज्या..
क्षणोक्षणी तुझी होता
नाही दुरावा क्षणाचा,
मन रूंजीते भोवती
धागा जुळला मनाचा...
डोळे अलवार मिटे
चित्र साकारते नवे,
भेट तुझी-माझी स्मरे
जन्मांतरी सौख्य हवे.