STORYMIRROR

sunil sawant

Romance Others

3  

sunil sawant

Romance Others

तू आणि केवळ तूच

तू आणि केवळ तूच

1 min
230

भाळी रेखली कुंकुमतिलिका

कृष्णकुंतलावरी शुभ्र गजरा

साजशृंगाराने काया सजली

अन् तुझ्या विभोर नजरा


जुळता सुर तुझे अन् माझे

जीवनगाणे आले बहरा

दु:ख नेहमी विरून गेले

दिसता तव प्रसन्न चेहरा


कधीचाच संपून गेलाय

आपल्यातील शब्द-पहारा

अंतरीच्या भावनांसाठी

पुरे केवळ नयन-इशारा


साथसोबतीने आयुष्याचा

केला हरेक क्षण साजरा

थकल्याभागल्या गात्रांना

आता एकमेकांचा सहारा


राखाडी रुपेरी केसांवरती

मोगऱ्याचा सुगंधी गजरा

साजशृंगाराविना लोभवती

तुझ्या प्रेमळ स्निग्ध नजरा.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance