अभंग
अभंग
1 min
122
साजरा सावळा । गळा वनमाळा ।
लेई पितांबर । विठुराया ॥
कर दोन्हीं कटी । चंदन लल्लाटी ।
उभा विटेवरी । विठुराया ॥
इंद्रायणी-भीमा । वामांगी रखमा ।
पंढरीस उभा । विठुराया ॥
भक्तांची माऊली । विश्वाची सावली ।
सर्वांना रक्षितो । विठुराया ॥
वैष्णवांचा मेळा । किर्तन सोहळा ।
रंगला नर्तनी । विठुराया ॥
तव भेटीसाठी । नयनांच्या ज्योती ।
आषाढी-कार्तिकी । विठुराया ॥