मृदगंध
मृदगंध
1 min
256
चाहूल लागता मृगाची
आभाळ जाहले गडद
पदन्यास करी मयुर
फुलवूनी पिसारा मंद
दुडूदुडू धावे पवन
पाठीशी घेऊनी जलद
साकारूनी पाऊसधारा
सांडल्या होऊन बेधुंद
तडतडणारे थेंब अन
हृदयात फुले आनंद
भिजली तृषार्त धरणी
दरवळे आसमंती गंध
ओसंडे चैतन्य सर्वत्र
तोडोनी सकल बंध
सजीव झाली सृष्टी
शोषूनी अवघा मृदगंध
