तुझ्याशिवाय..! कविता...?
तुझ्याशिवाय..! कविता...?
तुझ्याशिवाय....! कविता...?
अवघडच आहे.....
हा.... होतं असं कधी-कधी
जेंव्हा हरवतात शब्दही
पण तुझ्याशिवाय कविता म्हणजे
खरंच अवघड आहे....
माझ्याही पेक्षा
माझ्या या शब्दांना तुझीच आवड आहे...
आणि म्हणूनच प्रत्येक कवितेतून
प्रेमाबरोबर तुझीच सांगड आहे....
अगं खरंच तुझ्याशिवाय कविता
खूपच अवघड आहे....
रोज जरी लिहितो
आणखी वेगळं नवीन
कवितेतली तू तीच जुनी आहे...
तूच सांग सखे तुझ्याशिवाय...
माझ्या मनात आणखी कुणी आहे...
गालात हसत असशील तू
वाचून याही कवितेला...
मान्य आहे शब्दांची मांडणी
थोडीशी जड आहे...
पण हे मात्र तितकंच खरं बरं का...
तुझ्याशिवाय कविता..? अवघडच आहे

