STORYMIRROR

VINAYAK PATIL

Romance Others

3  

VINAYAK PATIL

Romance Others

पावसाळा

पावसाळा

1 min
275

पाऊस आला, पाऊस

घेऊनी संगे वारा

पाऊस येता भरूनी 

जाई आसमंती सारा


गडगड करूनी मेघ

नाद अंबरी भरतो

सौदामिनीचा प्रकाश 

पसरूनी धरणीवर येतो


पाऊस येता हर्षुनी 

रिमझिम गाणे गातो

पिसारा फुलवूनी मोर

नृत्य वनात करतो


वेलींवरी कळ्या पहा 

फुलती डुलती आनंदात

भिजता-भिजता ऐका

पाऊस गाणे गायी सुरात 


पाऊस येता भिजलेल्या

मातीचा दरवळे सुगंध

सुचते मजला नकळत 

तेव्हा गीत असे स्वच्छंद 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance