रुसवा
रुसवा
किती दिवसांनी तुला, असं रुसलेलं पाहिलं.
पाहण्याच्या नादात, अजून चिडवायाचं मात्र राहिलं.
नवरसा मध्येच आहे, सुरेख असा गोडवा.
रागाचा पारा चढताच, नशीब माझे सोडवा.
बरं चिडलीस कितीही, तरी घडघड काही बोलत नाई.
एकटक शांत काही बघितलं, की अलगद गालात हसू येई.
असला कसला राग, पाहिलं की हसायला येतं.
दिवसभराची थकावट, सगळी आडोश्याला मग जातं.
नाहीत कसल्या अपेक्षा तूझ्या, नाहीत काही मागण्या.
कुजबुज थोडी नक्कीच मनात आहे, वेळ पाही सांगण्या.
कळते तूझ्या मनाची घालमेल, सगळं काही माझ्यासाठी.
म्हणून का घ्यावी नवरसांच्या थाळीत, रागाच्या खीरीची वाटी.
हल्ली सतत हवाहवासा वाटतो, तूझा गोड रुसवा.
माझ्याही मना हसायला येतं, अभिनय करतो फसवा.

