STORYMIRROR

Shila Ambhure

Inspirational

4  

Shila Ambhure

Inspirational

रुष्ट वसुंधरा

रुष्ट वसुंधरा

1 min
665

रुसली बघा वसुंधरा ही 

देईना पाणी गार वाराही

वृक्षांची लागवड करुया

वसुंधरेला हसवूया।।धृ।।


वृक्षतोड झाली खुप

पृथ्वीचे बिघडले रूप

छोटी छोटी रोपटी लावूया।।1।।


गटारे,नाल्या तुंबलेले

पिशव्यात अन्न कुजलेले

प्लास्टिकचा वापर टाळूया।।2।।


घर अपुले ठेवू लख्ख

परिसर सारा करू स्वच्छ

कचऱ्याची विल्हेवाट लावूया।।3।।


पावसाचे पाणी हार्वेस्ट करू

जमेल तसे पुन्हा वापरु

पाण्याची बचत करुया।।4।।


झाडे लावू बहुवार्षिक

नाहीच मुळी ते खर्चिक

सडकेने बिया फेकुया।।5।।


वाढली जर हिरवी सृष्टी

होईल मग पर्जन्य वृष्टी

दुष्काळाला त्या हरवुया।।6।।


वृक्षारोपण सारे करू

संवर्धनाची कास धरु

भूमी अपुली सजवुया।।7।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational