STORYMIRROR

Manisha Awekar

Romance

4  

Manisha Awekar

Romance

रुप पाहता लोचनी

रुप पाहता लोचनी

1 min
423

रुप पाहता लोचनी

हर्ष दाटतो गं मनी

निर्व्याज गं तुझे मन

भावपूर्ण ते लोचन


रुप तुझे नयनी येता

आठवांची उधळण

गोड गुलाबी फुलांची

मनी रंगीत पखरण


रुप येतसा चक्षूत

मन अंतराळी जाये

फिरुनिया परि ते

तव हृदयात वसे


रुप नयनकमळी

मना येई अथांगता

प्रेमदर्या उसळता

प्रीत उभोरुनी येता


रुप तुझे गं सखी

मम मनी ये सारखे

काय करु सांग प्रिये!!

वेड तुझे लोचनाते


करी बंद मी लोचन

तरी तुझे आगमन

मन्मनी तुझे गं सखे

स्वामिनीचे आहे स्थान!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance