रुग्णवाहक
रुग्णवाहक
रस्त्यावरती जाता येता !
घन, घन, घन, घन ध्वनी नाद येई!!
धन्य तुला रुग्णवाहका!
रुग्णाला तु सुखरूप नेई!!
सिग्नल वरती रुग्णवाहिका जाता!
अंगावरती शहारे येती!!
हॉर्न तुझा लई भारी!
सिग्नलच्या गर्दीतही तु मार्ग काढी!!
डॉक्टरच्या आधीचा तू देवता!
नाही तुला तुझ्या जिवाची तमा!!
धन्य तुला रुग्णवाहका!
रुग्णाला वेळेवर पोहचविण्या,
करतो तु प्रयत्नांची पराकाष्ठा!!
हाक देता तु वेळेत हजर होई!
मानतो आम्ही तुझी जबाबदारी!!
रुग्णाला जिवदान, देणारा देवंदूत तु!
अखंड आयुष्य तुलाही देवो, श्रीहरी!!
धन्य तुला रुग्णवाहका!
धन्य तुला रुग्णवाहका!!!!
