STORYMIRROR

Mita Nanwatkar

Abstract Romance Fantasy

4  

Mita Nanwatkar

Abstract Romance Fantasy

ऋतू प्रेमाचा

ऋतू प्रेमाचा

1 min
462

तुझ्या एका कटाक्षाने

ऋतू प्रेमाचा सजतो

मन  पाखरू  अंतरी

चिंब  हर्षात भिजतो

सूर छेडिता   मधुर

गोड लाजते पापणी

गाली मोहरून  येई

प्रीत स्पर्शाची दाटणी

प्रेम गीत तुझे  गाते

हातातले  हे  कंगण

वाट तुझीच  शोधते

पायातले  रे  पैंजण

जीवनात  जगण्याचा

अर्थ नव्याने कळतो

स्तब्ध भाव उरातला

दूर  वेगाने   पळतो

रोमरोमी  अनामिक

ओढ जाणवे अवीट

एक जाहल्या श्वासास

लागू नये कधी दीट

मोरपंखी जाणिवांची

वाटे  दरवळ  न्यारी

पायघडी काळजीची

भासे स्वर्गाहून प्यारी

सामजंस्य विश्वासाचा

धागा रेशमी नात्यात

साठवण   सृजनाची

प्रीत स्मरण खात्यात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract