रस्ता
रस्ता


आयुष्याच्या वाटेवरचा
कठीण असतो रस्ता ,
होण्यासाठी यशस्वी
खाव्या लागतात खस्ता !!
खुप प्रयत्न करूनही
कधीकधी यश मिळत नसतं ,
अन त्यामुळेचं मग मन
हताश होऊन बसतं !!
अपयशामुळे स्वतःला कधी
त्रास करून घ्यायचा नाही ,
संकटाना नेहमी तोंड द्यायचं
पाठ फिरवून जायचं नाही !!
एक दिवस नक्कीच येईल
जो यशापर्यंत घेऊन जाईल ,
केलेल्या कष्टाचं अचानक
इच्छित फळ देऊन जाईल !!
आयुष्यात आलेल्या संकटांना
सांगायचं छाती ठोकून ,
द्या किती त्रास द्यायचा आहे
मी पण आहे नजर रोखून !!
आज नसेल जरी माझा दिवस
तरी एक दिवस नक्कीच असेल ,
त्या दिवशी मी संकटांनो
तुमचा खूप ऋणी असेल !!