STORYMIRROR

Pandit Nimbalkar

Inspirational

4  

Pandit Nimbalkar

Inspirational

ॠण आई वडिलांचे

ॠण आई वडिलांचे

1 min
336

आई बाप खरं सोनं 

नको मोडू मन त्यांचे

मोठा झाला तरी जाण

ॠण आई वडिलांचे ||धृ||


देवा केले रे नवस 

जन्मासाठी उपवास 

गर्भी सोस नऊमास 

गोड वेदनांचे भास ||१||


माय भरवी रे घास

लाड पुरवी तो बाप 

बोट धरून चालवी 

लागे कष्टांची ना धाप ||२||


कर्ज काढून शिकवी 

होता जरी तो अडाणी 

पाय रक्ताळले जरी 

त्याच्या आले नाही ध्यानी ||३||


सणा उपाशी निजला 

रात्री उशाला जागला 

ताप भरता रडली 

नाही जपली स्वतःला ||४||


सुख मागती देवाला  

तुझ्या प्रगतीची खुशी

नको दावू त्यांना काशी 

फक्त ठेव तुझ्यापाशी ||५||

 

झोळी वैभवाची खुजी 

धर चरण तू त्यांचे 

सात जन्मही न फिटे 

ॠण आई वडिलांचे ||६||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational