STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract Romance

4  

Manisha Wandhare

Abstract Romance

रोज रोज ...

रोज रोज ...

1 min
248

रोज रोज तु यावीस स्वप्नात माझ्या ,

रोज रोज तु फुलावीस अंगणात माझ्या ,

रोज रोज मी पाहतो तुला डोळ्यांत माझ्या ,

रोज रोज तु दरवळतेस श्वासात माझ्या ...

ती ए घडी जेव्हा तु स्पंदनांची झाली ,

त्याच घडीने माझी हर घडी तुझी केली ,

आता रोज रोज उगवतेस दिवसात माझ्या ,

अन् रोज रोज मिटतेस पापण्यांत माझ्या ...

तुला ना कळली फुलली आयुष्याची वेली ,

बहरली डवरली तुझ्यासवे तरी तु अलबेली ,

रोज रोज तु सप्तरंगी कमान इंद्रधनुष्याची माझ्या ,

रोज रोज तु जिंकतेस मी हरतो प्रेमात माझ्या ...

सांगु की नको सांगु गोष्ट ही एकतर्फी झाली ,

प्रेमाची माझ्या पहिली व्याख्या मला कळली ,

रोज रोज तोडून चौकट मी उडतो आकाशी माझ्या ,

रोज रोज प्रतिंबीब पांघरूण तुझे विसरतो दुःखास माझ्या ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract